अहमदनगर - नेवासा तालुक्यातील बेल्हेकरवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कमल गणेश पवार, तर उपसरपंचपदी रेखा सुदाम बर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
रुपाली संतोष शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी मंगळवारी (दि. १३) निवडणूक प्रक्रिया पार पडली. मंडल अधिकारी प्रशांत कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
सरपंच पदासाठी कमल पवार यांचा, तर उपसरपंच पदासाठी रेखा बर्डे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कांबळे यांनी दाेनही पदाधिकाऱ्यांची बिनविराेध निवड घाेषित केली.
यावेळी ग्रामसेवक कृष्णा बडे, तलाठी शशीकला तांबे यांनी प्रक्रिया पार पडली. यावेळी कानिफनाथ येळवंडे, दत्तात्रय बेल्हेकर, कानिफनाथ पवार, संतोष शिंदे, अशोक पवार, गणेश पवार, सागर पवार, संजय पवार, उपस्थित होते.
तसेच पोपट बेल्हेकर, सूरज शिंदे, विजया बेल्हेकर, रूपाली शिंदे, बेबीताई येळवंडे, सविता बेल्हेकर, वंदना बेल्हेकर, प्रीती पवार, आदी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
या निवडीचे माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी सभापती सुनील गडाख यांनी स्वागत केले. आपल्या कार्यकाळात विकासाला प्राधान्य देणार असल्याचे नूतन सरपंच पवार यांनी सांगितले आहे.