कोत‌वाली पोलिस स्टेशन व 'स्नेहबंध'तर्फे वृक्षारोपण


अहमदनगर - वृक्षारोपण करताना पर्यावरण रक्षणाचा संदेश देत प्रत्येक नागरिकाने एक तरी वृक्ष लागवड करावे. आजच्या काळात वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले.


कोतवाली पोलिस स्टेशन व स्नेहबंध सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोतवाली पोलिस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी स्नेहबंध फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उध्दव शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे, माजी प्राचार्य एकनाथ जगताप, पीएसआय प्रविण पाटिल, पोलिस हेड पांढरकर, अमोल बास्कर, स्वयंम बास्कर, संजय कुलकर्णी, तसेच इतर अंमलदार उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक दराडे यांनी यावेळी सामाजिक, जातीय व धार्मिक सलोखा अबाधित राहील यादृष्टीने मार्गदर्शन केले. तसेच आपल्या घराजवळ, शेतात, मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. उद्धव शिंदे यांनी आभार मानले. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !