जायचंय यार एक दिवस आपल्यालाही. किती तरी नाती असतात आपली. खुप जपत असतो साऱ्यांना. सोबत असतात ती आपल्या, सुखात कधी दुःखात. आपल्या जगण्यात.
घट्ट एकमेकांसोबतच्या अनेक क्षणांची साक्षीदार असतात. मित्र, मार्गदर्शक तर कधी नातेवाईक... अशी अनेक पदर घेऊन.. ही नाती म्हणजेच जीवन असतं आपलं..
संघर्ष.. कधी धावायचं, अडचणी येतात, मात करायची, आडोशाला पाठ टेकून जगण्याची प्रेरणा शोधायची. तो गेला, आधीही अशीच अनेक, ओंजळ रिकामी... आठवणी ठेवून गेला..
जपायच्या तरी किती.? आता परत येणार नाही तो कधीच, राहिलं गतकाळच्या स्मृतींचा ठेवा. यार, आपलं यातलं काहीही नाही, कधीतरी मलाही निरोप येईल.. आठवणींचा डोह कोरडा होईल. अध्याय समाप्त होताना नाती विरून जातील, आपोआप...
- जयंत येलुलकर (अहमदनगर)