आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा
नाशिक : दोषयुक्त मोबाईल देउन ग्राहकाचे आर्थिक नुकसान केले, तसेच यामुळे मानसिक त्रास झाल्याबद्दल नुकतेच जागतिकस्तरीय एमआय रेडमी मोबाईल कंपनीला नाशिक येथील न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. या प्रकरणी त्रस्त ग्राहकाची बाजू ऍड. उमेश अनपट यांनी न्यायालयात मांडली.
ऍड. उमेश अनपट यांनी मांडली बाजू : या प्रकरणी तक्रारदार पवार यांची बाजू ऍड. उमेश अनपट यांनी न्यायालयात मांडली. न्यायालयासमोर सादर केलेल्या पुराव्यांच्या आणि मांडलेल्या युक्तीवादाच्या आधारे न्यायालयाने शाओमी टेकनॉलॉजी इंडिया प्रा. लि. म्हणजेच एमआय रेडमी कंपनीला आदेशीत केले आहे.
आदेशात म्हटले आहे की : शाओमी टेकनॉलॉजी इंडिया प्रा. लि. म्हणजेच एमआय रेडमी कंपनीने तक्रारदार यांना नवीन मोबाईल अथवा मोबाईलची किंमत द्यावी. तसेच फोन खरेदी केल्यापासून म्हणजेच दि. 4/12/2022 पासून ते प्रत्यक्ष पूर्ण रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे. प्रमाणे 10 % व्याजापोटी तक्रारदारास द्यावी. तसेच झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.7,000/- (सात हजार) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- (पाच हजार) अदा करावेत.
या न्याय मंच्यासमोर चालला खटला : नशिक येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात हा खटला दाखल आहे. न्याय मंचाच्या अध्यक्षा न्यायाधीश मंदाकिनी एस. भोसले, सदस्या न्यायाधीश प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, सदस्या न्यायाधीश प्रेरणा महाजन-लोणकर यांच्या समोर या खटल्याचे कामकाज चालले. सदस्या न्यायाधीश प्रेरणा महाजन-लोणकर यांनी वरील आदेश पारीत केले.