निसर्ग..
सागर किनारा
सोबत आहे,
जगण्यात मजा आहे..
तो दृष्टी देतो
व्यापकता त्याच्या नसानसात
तो शिकवतो
धडे देतो
संस्कार देतो
तो विशाल, तो महाकाय..
दूरदूर तोच..
तो राजा..
त्याच्या कवेत क्षितिज
तो सुंदर
तो प्रेमळ...
तो जवळ येतो,
हितगुज करतो
गालावरून हात फिरवतो
त्याला सारी दुःख सांगावी,
अन् मन मोकळं व्हावं
लाखो वर्षांचा प्रवास त्याचा
आपल्यासारखी अगणित
खेळलीत त्याच्या अंगाखांद्यावर
लाटा अंगावर घ्याव्या,
चिंब भिजून जावं..
त्याची भेट
जगण्याची आशा,
सुंदर आयुष्याचा साक्षात्कार
तो मित्र, तो सखा
तो माझा, तो तुमचा
अजूनही तसाच..
त्याचा किनारा,
अन् दूरदूर वर उमटलेले
माझ्या पावलांचे ठसे
- जयंत येलुलकर (अहमदनगर)