अहमदनगर - घोडेगाव (ता. नेवासा) येथे घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भव्य दिव्य इमारतीचे बांधकाम सुरु आहे. यासाठी ग्रामस्थ, शिक्षक आणि माजी विद्यार्थी आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.
या इमारतीच्या बांधकामासाठी माजी विद्यार्थी देखील सहकार्य करत आहेत. या विद्यालयात शिक्षण घेतलेल्या सन १९९९-२००० च्या बॅचच्या वतीने देखील सहभाग म्हणून २१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
याप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य श्रीमती लंके मॅडम, कदम सर, जाधव सर, झाडे सर आदी उपस्थित होते. मदत निधी संकलनासाठी श्री योगेश सोनवणे, विजय सोनवणे, गिरीश आइनर, दिगंबर सोनवणे, पंढरीनाथ वाघाडे, भाऊराव जावळे, यांनी सहकार्य केले.
तसेच मच्छिंद्र कुतरवाडे, रामकीसन सोनवणे, दत्तात्रय भोसले, दीपक लोखंडे, फिरोज सय्यद, चंद्रकांत गवळी, राजू नवले, संदीप सुरसे, बाबू बर्डे, महेश खुळगे, अनिल वैरागर, संभाजी बाचकर, या माजी विद्यार्थ्यानीही सहकार्य केले.