अहमदनगर हे ऐतिहासिक शहर आहे. येथे ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. तसेच अनेक ऐतिहासिक वारसा लाभलेली स्थळे आहेत.
या शहराने त्याच इतिहासात जगावं, त्या पद्धतीने आपली गुजराण करीत रहावं, पूर्वी जशी घरात, रस्त्यांवर अंधारात पेटत्या मशाली असायच्या. आजही त्याचं अनुकरण केलं म्हणजे इतिहासाला उजाळा मिळेल.
यासाठी आमचाही हातभार लावण्यासाठी, हा वारसा टिकविण्यासाठी आम्ही दररोज हे शहर, त्याचं उपशहर म्हणजेच सावेडी अंधारात ठेवत राहू. कदाचित यासाठीच या शहरातील विज वितरण महामंडळ म्हणजेच पूर्वाश्रमीची एमएसईबी नगरवासियांना अंधारात ठेवत असेल...!
किती छान कल्पना आहे या महामंडळाच्या येथील अधिकाऱ्यांची अन् कर्मचाऱ्यांची.. नाहीतरी आम्हीही लाज सोडलीच आहे. गुडूप अंधारात चोऱ्या करणाऱ्या चोरांचा ही वीज मंडळाचे कर्तव्य बजावणारे अधिकारी सहानुभूतीने व्यापक विचार करतात ना..! हे खेडे आहे की महानगर..? की आपलीच जगण्याची पातळी खालावली आहे ?
- जयंत येलुलकर, (माजी नगरसेवक)
अहमदनगर