अहमदनगर - येथील अतिरिक्त चीफ जुडीशियल मॅजिस्ट्रेट कोर्ट नंबर ११ हेमलता जाधव यांनी नुकतीच धनादेश न वटल्याप्रकरणी बाबासाहेब रावसाहेब उगले (रा. तिसगाव, पाथर्डी, अहमदनगर) यांना फिर्यादी भूषण बापूसाहेब शिंदे (रा. सावेडी) यांची फसवणूक केले प्रकरणी चार महिन्याची कैद व २ लाख ३२ हजार रुपये नुकसान भरपाई तसेच नुकसान भरपाई न दिल्यास एक महिना अशी शिक्षा सुनावली आहे.
फिर्यादी भूषण शिंदे यांनी आरोपी बाबासाहेब उगले यांच्याशी घरगुती संबंध असल्या कारणाने हात उसने म्हणून रक्कम दिली होती. परतफेड करण्यास आरोपी यांनी फिर्यादी यांना धनादेश दिला. पण तो बँकेत न वटल्याकारणाने फिर्यादी यांनी आरोपीविरुद्ध कोर्टात दाद मागितली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस शिक्षा दिली.
फिर्यादीच्या वतीने अँड. विक्रम वाडेकर, अँड. अतिश निंबाळकर, अँड. धैर्यशील (अजित) वाडेकर यांनी काम पाहिले. तसेच या व्यवहारासंदर्भात आरोपी यांनी एकूण चार जनादेश दिले होते. चारही धनादेश बँकेत वटल्या न गेल्याने आरोपीस चारही प्रकरणात एकाच वेळी शिक्षा झाली हे विशेष.
अँड. वाडेकर, अँड. निंबाळकर यांनी या प्रकरणात अत्यंत अभ्यासपूर्ण युक्तिवाद करून तसेच साक्ष पुरावा नोंदवून व उच्च न्यायालयातील निकालांचा संदर्भ देऊन फिर्यादीस चारही धनादेश अनादर प्रकरणी न्याय मिळवून दिला.