बांधकाम साहित्य विक्रेत्याला मारहाण, कुख्यात गुंडासह दोघांविरुद्ध गुन्हा


अहमदनगर - नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे बोअरवेलमध्ये पाईप सोडायची प्लेट आमच्याकडे उपलब्ध नाही, असे सांगितल्याचा राग मनात धरून दोघा जणांनी एका दुकानदारास मारहाण केल्याची घटना घडली आहे.


याप्रकारणी दुकानदाराने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सोनई पोलिसांनी निलेश मधुकर केदार व अरविंद अनिल लोंढे (दोघे रा. घोडेगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडेगाव येथे फिर्यादी यांचे बिल्डिंग मटेरियलचे दुकान आहे. दि. १६ मे रोजी दुपारी ५.३० वाजण्याच्या सुमारास निलेश केदार आणि अरविंद लोंढे यांनी दुकानात येऊन बोअरवेलमध्ये पाईप सोडायची प्लेट मागितली.

दुकानदाराने ती आपल्याकडे नसल्याचे त्यांना सांगितले. त्याचा राग आरोपींना आल्याने त्यांनी भिमराज भबुतारामजी पुरोहित (वय ५२) रा. श्रीराम कॉलनी सोनई यांना लोखंडी खोरे, हातोडी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत दाखल फिर्यादीवरून आरोपी निलेश मधुकर केदार व अरविंद अनिल लोंढे (दोघे रा. घोडेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा र. नं. २१९/२०२४ भा.दं.वि. कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार एम. आर. आडकित्ते हे करत आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !