अहमदनगर - संपदा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या १३ कोटी ३८ लाख ५५ हजार रुपयांच्या घोटाळ्यातील २२ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरले आहे. दि. ८ एप्रिल रोजी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे साहेब यांनी सर्व आरोपींना दोषी धरले आहे. या घोटाळ्यातील आरोपींमध्ये ज्ञानदेव सबाजी वाफारे याच्यासह राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांचाही समावेश आहे.
या घोटाळ्यात ज्ञानदेव सबाजी वाफारे, सुजाता ज्ञानदेव वाफारे, सुधाकर परशुराम थोरात, भाउसाहेब कुशाबा झावरे, उत्तमराव दगडू चेमटे, दिनकर बाबाजी ठुबे, विष्णूपंत गणपत व्यवहारे, राजे हसन अमीर, बबन देवराम झावरे, लहू सयाजी घंघाळे, हरिश्चंद्र सावळेराम लोदे, रविंद्र विश्वनाथ शिंदे, साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर, संजय चंपालाल बोरा, अनुष प्रविण पारेख, मारूती खंडू रोहोकले, चिमाजी खंडू रोहोकले, बबन खंडू रोहोकले, सुधाकर गोपीनाथ मुंबे, गोपीनाथ शंकर सुंबे, महेश बबन झावरे व संगिता हरिश्चंद्र लोंढे, अशी आरोपींची नावे आहेत.
संपदा पतसंस्थेच्या झालेल्या अपहार रक्कम रू. १३.३८,५५,६६७ प्रकरणी वेगवेगळ्या कलमांखाली दोषी धरलेले आहे. आरोपींना शिक्षा देणेबाबतची सुनावणी दिनांक ८ एप्रिल रोजी न्यायालयात ठेवलेली आहे. या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने ज्येष्ठ सरकारी अभियोक्ता अनिल ढगे हे काम पाहत आहेत.