अहमदनगर - शहरातील प्रसिध्द विधिज्ञ मंगेश निळकंठ सोले यांची भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालय, कायदेशीर कार्य विभाग, नोटरी सेलद्वारे पब्लिक नोटरीपदी निवड झाली आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तारातून अभिनंदन होत आहे.
ऍड. मंगेश निळकंठ सोले हे २४ वर्षापासून अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी व फौजदारी वकीली करतात. ते वकिली व्यवसाय सांभाळत सामजिक आध्यातमिक उपक्रमामध्ये हिरारीने सहभागी होत असतात.
ते विविध पतसंस्था बँका यांच्या पॅनलवर आहेत. ऍड. मंगेश निळकंठ सोले यांची नोटरी पब्लिकपदी नियुक्ती झाल्याबद्दल न्याय, शैक्षणिक आणि राजकीय आर्थिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.