न्याय सर्वांसाठी ! चोरीच्या गुन्ह्यातून आरोपीची मेरिटवर निर्दोष मुक्तता


अहमदनगर - मुख्य न्यायदंडाधिकारी अहमदनगर यांनी शंकर मच्छिंद्र नेटके याची चोरीच्या गुन्हातून निर्दोष मुक्तता केली आहे. त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात चोरीसह तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.


संशयित आरोपी म्हणून तो सबजेल, कारागृहात होता. त्याची घरची परिस्थिती ही हलाखीची असल्याने त्याच्या वतीने न्यायालयात बचावाची बाजू मांडण्यासाठी विधीज्ञांची नेमणूक करता आली नाही. 

त्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांचेतर्फे मोफत व सक्षम विधी सेवा देण्यासाठी लोकअभीरक्षक कार्यलयातील सहाय्यक लोक अभीरक्षक ॲड. रुपाली शिवाजीराव पठारे यांची बचाव विधीज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

त्याप्रमाणे हे प्रकरण न्यायालयात गुण दोषावर चालवून यात प्रकरण मेरिटवर चालले. ॲड. रुपाली पठारे यांनी  आरोपीची निर्दोष मुक्तता केल्याने त्यांचे कामाचे सर्वांनी कौतुक केले. तसेच लोक अभीरक्षक कार्यालयाचे कामावर समाधान व्यक्त केले गेले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !