हद्दपार करुनही शहरातच मुक्काम, 'हे' ४ सराईत गुन्हेगार झाले जेरबंद


अहमदनगर - शहरातील तोफखाना, भिंगार, एमआयडीसी या पोलिसांनी हद्दपार केलेले ४ सराईत गुन्हेगार शहरातच वावरत होते. त्यांनी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले आहे.


रोहित वसंत फंड (वय २९, वंजारगल्ली, साळुंखेवाडा, नगर), मडक्या उर्फ शुभम उर्फ शिवम मारुती धुमाळ (वय २३, त्रिमूर्ती चौक, सारसनगर), नितीन किसन लाड (वय २५, भगवानबाबा, सारसनगर), व प्रवीण विजय मिरपगार (वय २३, नागपूर, अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हद्दपार केलेल्या व शरद गुन्हेगारांची शोध मोहीम राबविण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या ४ जणांना पकडले.

अहमदनगर क्राईम ब्रँचचे पोलीस कर्मचारी दत्तात्रय हिंगडे, भाऊसाहेब काळे, बापूसाहेब फोलाणे, संतोष लोंढे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पवार, रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले, संतोष खैरे, विजय ठोंबरे, आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

लोकसभा निवडणुकीच्या काळात शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार केलेले गुन्हेगार बेकायदेशीर रित्या वास्तव्य करताना आढळून आले तर त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कार्यवाही केली जाईल असा इशारा पोलीस दलाने दिला आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !