'मित्र' नावाचा मौल्यवान आरसा


आपण कितीही किंमती कपडे घातले पहायला तर आरसा नसेल तर.. आपण जसे आहोत तसे दाखवणारा आरसा. आरसा सच्चाईचा पाईक..! एक आरसा फुटला तर त्यातून त्यातून श़ंभर तुकडे होतात. पण ते आरसेच रहातात... ते आपल्याला प्रतिबिंब दाखवायचा त्याचा गुण सोडत नाहीत...!

मिथिलाताई म्हणतात तसे खरेपणाचा गुण सोडत नाही तो...! खरंच असे मित्रमैत्रिणीही असायला हवेत ना आयुष्यात.. आपल्याला खरं दाखवून देणारे.. आपला बिघडलेला मेकअप असो वा मनस्थिती यातल्या ठळक चुका आपल्याला दाखवणारे...! खरंतर स्पष्ट बोलणारे लोक आणि फटकळपणा असलेले लोक यात एक धूसरशी रेषा आहे.. ती मात्र ओळखता यायला हवी.

फाडकन दुसऱ्यांना तोडून बोलणाऱ्या लोकांना समोरच्याच्या मनात स्थान मिळत नाही. पण समोरच्याचे मन न दुखावता आपला खरेपणा सोडत नाहीत. पण लोकांना कधी कधी हा स्पष्टतेचा आरसा नको वाटतो. मग ते म्हणतात, "आईना कुछ नहीं नज़रका धोका है,  नजर वही आता है जो दिल में होता है"

कुणाला काय काय वाटते.. आरसा दाखवतो ते खरं नाही वाटत त्यांना, "आईना भला कब किसी को सच बंता पाया है, जब भी देखो दायां तो बायां नजर आता है" कारण ह्या माणसांना सतत स्वतःची प्रशंसा ऐकायला आवडते. काही का असेना आरसा म्हणजे प्रांजळपणा..

आरश्यासारखी माणसं अवतीभवती असायला हवीत.. म्हणजे आत्मपरीक्षणाची आपल्याला संधी मिळते.. माझ्याजवळ आहे बरं माझी आरतीताई..! Balanced personality....!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !