शनिवारी अहमदनगरमध्ये मंत्री छगन भुजबळ यांचा 'महाएल्गार मेळावा'

आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा

अहमदनगर - शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर शनिवारी, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते उपस्थित असणार आहेत.

(छायाचित्र : महेश कांबळे)

या मेळाव्यासाठी सकल ओबीसी आयोजन समितीने जय्यत तयारी केली आहे. या मेळाव्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसीचे नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार प्रकाश शेंडगे, राम शिंदे, कल्याणराव दळे, प्रा. लक्ष्मणराव गायकवाड, शब्बीरभाई अन्सारी, पी. टी. चव्हाण, दौलतराव शितोळे,सत्संग मुंढे, लक्ष्मणराव हाके आदी ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याला चार ते पाच लाख ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राजपॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत सकल ओबीसी भटक्या विमुक्त आरक्षण बचाव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेत सुधाकर आव्हाड, अंबादास गारुडकर, अनिल निकम, बाळासाहेब भुजबळ, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शरद झोडगे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अभय आगरकर, दादाभाऊ चितळकर, रमेश सानप, अरविंद धिरडे, छायाताई नवले, प्रकाश सैंदर, हरिभाऊ डोळसे, मंगल भुजबळ, आदी उपस्थित होते.                  

महाएल्गार मेळाव्याची सविस्तर माहिती अंबादास गारुडकर आणि दादाभाऊ चितळकर यांनी नमूद केली. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध नव्हता व नाही. परंतु ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये.

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी भूमिका ओबीसी समाजाची होती व आहे. परंतु मराठा आरक्षणाचा मसुदा जाहीर झाल्यानंतर ओबीसी समाजात यामुळे तीव्र असंतोष व अस्वस्थता निर्माण झालेली आहे. तसेच एक प्रकारची अन्याय झाल्याची घटना घडली आहे.

या पार्श्वभूमीवर नगरमध्ये ओबीसींचा पहिला भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्याला स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नगर शहरातील पार्किंगची व्यवस्था पांजरपोळ मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ, मार्केट यार्ड चौक, YMC मैदान, खालकर हॉस्पिटल जवळ, अहमदनगर बॉईज हायस्कूल मैदान, कोठी रोड, येथे केली आहे.

तसेच सभेच्या ठिकाणी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, आरोग्य व्यवस्थेसाठी रुग्णहिकेची व्यवस्था केलेली आहे. प्रवेशद्वाराला लोकनेते बबनराव ढाकणे यांचे नाव देण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी ओबीसी समाजाने मोठ्या संखेने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !