गुलजारजींकडे प्रत्येक समस्येवर उत्तर असतंच..


मला कुठलही गाणं ऐकताना धुन आवडतेच. पण त्यापेक्षा गाण्यातील शब्दांना समजून घ्यायला, त्यातल्या आशयगर्भ वेदनांना आपलेसे करायला खूपच आवडते..

गुलजारसाहेबांबद्दल काय बोलावं.. आपण पानभर शब्दांत मांडू शकणार नाही ते गुलजारसाहब दोन ओळीत मांडतात.. आणि आपलं काळीज कधी चोरून टाकतात कळतही नाही. स्वप्न पाहणाऱ्या नव्या पिढीचं गाणं लिहताना गुलजार लिहितात...

खाली भोर दुपहरोंसें
हम तो झोला उठाके चले..
बारीश कम-कम लगती है
नदियां मध्दम लगती है
हम समंदर के अंदर चले

छोट्या गावातून मोठ्या शहरांकडे वाटचाल करणाऱ्या तरुण पिढीच्या भावना गुलजारजी अलवार मांडत राहतात.

गुलजार साहेबांनी फाळणीच्या वेदनांना उराशी न धरता एक संपूर्णसिंह कालरा गॅरेजमध्ये काम करता करता अंतरीच्या शब्दांना जागं ठेवत.. बिमल रॉयनी दिलेल्या संधीचे सोने करत 'बंदिनी' चित्रपटात अनेक एकापेक्षा एक सरस गीते रसिकांना दिली..

गुलजारजींकडे प्रत्येक समस्येवर उत्तर असतंच.. ८८ व्या वर्षात पदार्पण करतानासुध्दा संपूर्णसिंह कालरा अनेक गुलजार शब्द आपल्याला देत रहातात.. मासूम, इजाजत, आँधी, तरल तरल शब्द आपल्याला व्याकूळ करत रहातात..

'मेरा कुछ सामान' ऐकताना डोळे न ओलावणारा रसिक विरळाच...! गुलजार शायरीने तर आपण अक्षरशः खुळावून जातो...

तकलीफ खुद ही कम हो गई,
जब अपनों से उम्मीद कम हो गई...

हा गुलजारसाहब, अपनों से अब उम्मीद ही नही.. तरीही उगाचंच वाटत राहातं,

जब भी ये दिल उदास होता है,
जाने कौन आसपास होता है,
कोई वादा नही लेकीन
क्यों उनका इंतजार होता है...

गुलजारजी असे मन वाचत रहातात..
कधीकधी वास्तवात आणतात,

बचपन में भरी दुपहरी में
नाप आते थे पूरा मोहल्ला,
जब डिग्रिया समझ मे आयी
पांव जलने लगे है...।

अखेर आयुष्य म्हणजे तरी काय असतं हो.. सफर.!

जिंदगी यूँ हुई बसर तन्हा,
काफि़ला साथ और सफर तन्हा...।

हे एकटेपण आणि हे आयुष्य.. हे जीणं सतत आपल्याला काही ना काही शिकवत असते...

इतना क्यों सिखाए जा रहे हो जिंदगी,
हमें कौन सी सदियां गुजारनी है यहां..।

तरीही दिवस कंठावे लागतातच ना, अर्थात आपल्याकडे पर्याय कुठे असतात... यात जीवनावर राग नाही, तिच्याशी साधलेला संवाद आहे.. दिवस जात रहातात...

दिन कुछ ऐसे गुजारता है कोई,
जैसे एहसान उतारता है कोई..!

मग आपल्याला वाटत रहाते आयुष्य असं का आखलंय निर्मिकाने आपलं.? उगाचच आपण आयुष्याला प्रश्न विचारत राहतो... उत्तरही आपणच देऊन रिकामे होतो.. होय ना...!

लगता है जिंदगी..
कुछ खफा खफा है,
चलिए छोडिए जी,
कौनसी पहिली दफा है...

आपल्या कोसळलेल्या वेदनांना शब्दरुप देतात गुलजारसाहब,

शायर बनना तो बहुत आसान है बस
एक अधूरी मोहब्बत की मुकम्मल डिग्री चाहिए....

शेवटी एवढच म्हणेन गुलजारजींच्या शब्दात,

दिल अगर है तो दर्द भी होगा
इस का कोई हल नही है शायद..

गुलजारजी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन अभिनंदन.!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !