'रायझिंग डे'निमित्त पोलिस दलाचा 'स्नेहबंध'तर्फे कृतज्ञतापूर्वक सन्मान


गौरव पठाडे (अहमदनगर) - २ जानेवारी हा दिवस 'महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत 'सदरक्षणाय, खलनिग्रहणाय' हे ब्रीद जपणार्‍या कर्तव्यनिष्ठ पोलिस दलातील कर्मचार्‍यांना त्यांच्या कामासाठी सलाम केला जातो.

स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला व सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह पोलिस दलातील बांधवांना शुभेच्छा देत त्यांच्या खाकी वर्दीला सलाम केला आहे.

यावेळी निशांत पानसरे, दीपक सरोदे, अक्षय भोसले, दिगंबर तनपुरे, राहुल बोडखे, अजय गव्हाणे आदी उपस्थित होते. डॉ. उद्धव शिंदे म्हणाले २ जानेवारी १९६१ रोजी भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला पोलिस ध्वज प्रदान केला होता.

त्यामुळे २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिस दिन म्हणून साजरा केला जातो. अहमदनगर पोलिस रात्रंदिवस नगरकरांच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे नगरकरांचे कर्तव्य आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !