सोनईच्या शनैश्वर विद्या मंदिरमध्ये हळदी कुंकू समारंभ व महिला मेळावा


सोनई (अहमदनगर) - श्री शनैश्वर माध्यमिक विद्यामंदिर सोनई विद्यालयात हळदी कुंकू समारंभानिमित्त महिला मेळावा महिलांनी उखाणे घेत उत्साहात साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साध्वी श्री तुलसी देवी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. स्वाती कळसकर व डाॅ. देविका कळसकर या होत्या.

अध्यक्षीय भाषणात साध्वी तुलसी देवी यांनी जो प्रयत्न सोडत नाही, तो एक दिवस जीवनामध्ये यशाच्या शिखरावर गेल्याशिवाय राहत नाही तसेच गुरुजनाबद्दल आदर बाळगा. महापुरुषांचे चरित्र वाचा. केस वाढवून फॅशन करण्यापेक्षा विवेक वाढवून विवेकाची फॅशन करा, असे त्यांनी सांगितले.

विवेकाने आपल्या जीवनाचे अस्तित्व जगासमोर आल्याशिवाय राहणार नाही असा संदेश दिला. तसेच डॉ. देविका कळसकर यांनी मौखिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. स्वाती कळसकर यांनी व्यायामाचे महत्व सांगितले.

विद्यालयाच्या शिक्षिका सुनंदा घाडगे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच रोहिणी गडाख यांनी संक्रांतीचे महत्त्व सांगितले व निशा होंडे यांनी आभार मानले. वैशाली गाडे, विद्या दरंदले, आशा जंगले, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईआर्या अडसूळ हिने केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य खोसे सर व उपप्राचार्य ठोंबळ सर, पर्यवेक्षक ढाले सर, श्री कर्जुले सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. या मेळाव्यास मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !