संभाजी महाराज यांनी लिहिलेले ग्रंथ... संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, ग्रंथाचे नाव - बुधभुषणम. संभाजी महाराजांनी अजून ३ ग्रंथ लिहिले: नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक.
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले आहेत.
संभाजी महाराजांनी शहाजी महाराजांचे संस्कृतमध्ये वर्णन
भृशत् बलान्वयसिन्धुसुधाकरः
प्रथितकीर्त उदार पराक्रमः |
अभवत् अर्थकलासु
विशारदो जगति
शाहनृपः क्षितिवासवः ||
मराठी मध्ये अर्थ: सिंधुसुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिवान, उदार, पराक्रमी व अर्थकलांमध्ये विशारद असे राजे शहाजी होऊन गेले.
अशा या पराक्रमी, स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पुत्र आणि पत्नीच्या मनात पेरणाऱ्या शहाजीमहाराज साहेबांचा आज स्मृतिदिन. बंगलोरहून येताना शिवरायांना दूरदृष्टी ठेवून स्वतंत्र राज्यमुद्रा, ध्वज दिला होता. यात आपल्या पराक्रमी पुत्रावर असलेला विश्वास दिसतो.
महाराज साहेब आदर्श पती आणि पिता होतेच.पण त्याबरोबरच ते पराक्रमी योध्दा होते. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र वंदन.
२३ जानेवारी १६६४.
होदेगिरी, कर्नाटक
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)