१६ जानेवारी १६८१ मध्ये शंभूराजेंचा राज्याभिषेक झाला.महाराष्ट्राला दुसरे पराक्रमी छत्रपती लाभले. पदरी असलेल्या विषारी नागांना माफ करुन पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतले. १६८२ मध्ये औरंग्याने स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सैनिक शंभू राजेंच्या सैन्यापेक्षा पंधरापट जास्त होते. तरीही एकटा रामशेज घेण्यासाठी औरंग्याला साडेसहा वर्षे लागली.
शंभूराजेनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिध्दी, म्हैसूरचा चिकदेवराय यांना असा धडा शिकवला की या लोकांची औरंग्याला मदत करायची हिंमत झाली नाही.. अशा शंभूराजेंना मात्र साहित्यिक आणि नाटककारांनी नाहक बदनाम केले.
पण सुर्यावर थुंकल्याने त्यांचे तेज कमी होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला हजर असणारा इंग्रजाचा वकील लिहितो, "मी रायगडावर आलो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहिला. त्या सोहळ्यात भेट झाली संभाजीराजांशी.
दिसायला अतिशय सुंदर पण माझ्या लक्षात आले की हा मुलगा आपल्या रयतेशी मराठी बोलतो, उत्तरेतील लोकांशी हिंदीत, आम्हां इंग्रजांशी इंग्रजीत, पोर्तुगीजांशी पोर्तुगीजमध्ये, मला आश्चर्य वाटले म्हणून मी चौकशी केली तर संभाजी राजांचे १४ भाषांवर प्रभुत्व होते.
ऍबे कॕंरे १६७२ ला स्वराज्याला भेट दिलेला फ्रान्सचा एक प्रतिनिधी लिहितो, 'युवराज लहान आहेत तरीसुद्धा आपल्या पित्याच्या कीर्तीला साजेसेच आहेत. मोठ्या छत्रपतीसारखे युद्धकुशल, अत्यंत स्वरुपवान आहेत. युद्धकलेत संभाजीराजे इतके तयार झाले आहेत की एखाद्या लढवय्या सेनापतीला नमवू शकतील.
ते उंच, मजबूत बांध्याचे आहेत. त्यांच्यावर त्यांचे सैनिक अतिशय प्रेम करतात, त्यांच्या नेतृत्वाखाली लढणे सैनिकांना आवडते. ज्या इतिहासकारांनी सत्य प्रकाशात आणले त्यांना धन्यवाद.!
असे छत्रपती संभाजीराजे एक ज्वलंत व्यक्तीमत्व.. शिवरायांचा, सईआईंचा छावा.. जिजाऊ मांसाहेबांचा काळीज तुकडा.. येसूबाईंना समतेचे बिरुद देणारे छत्रपती.. चौदाव्या वर्षी बुधभूषण लिहिणारा..
आपल्या देहदानाचे स्वराज्यरक्षक म्हणून चंद्र सूर्य असेपर्यंत मराठी मनांवर राज्य करणारे सर्वांचे धाकले धनी.. चारशे वर्षानंतरही मराठी मनाच्या सिंहासनावर विराजमान झालेले छत्रपती...! छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र वंदन.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)