लई भारी ! 'साईबन'मध्ये वाढतेय हुरडा पार्ट्यांची क्रेझ


अहमदनगर - जवळील शिर्डी रोडवरील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या साईबनमध्ये हुर्ड्याची मौसम संपत आल्याने स्वाद घेण्यासाठी साईबनला खवय्ये येत आहेत व पसंती देत आहेत, साधारणत: अजून १५ ते २० दिवस हुरडा उपलब्ध राहील, असा अंदाज आहे. 

सध्या पडलेल्या थंडीत बंद घरात बसण्यापेक्षा शेकोटी शेजारी बसून चटपटीत हुरडा,जोडीला चमचमीत वांग्याची भाजी, मिरचीचा ठेचा अन् गरम भाकरीवर ताव मारण्यासाठी खवय्यांची पावले साईबन कडे वळत आहेत.

गेल्या १० दिवसांत थंडीचा जोर वाढल्यामुळे पर्यटकांनी पुन्हा सहलीचे नियोजन सुरू केले आहे. छोट्या सुट्टीसाठी त्यांनी हुरडा पार्टीचा पर्याय निवडला आहे. ग्रामीण भागापासून दुरावलेल्या नागरिकांना साईबन कृषि पर्यटन केंद्रांमुळे गावाकडे जाण्याची संधी मिळते आहे.

त्यामुळे बर्गर, पिझ्झाला दूर करून लोक या केंद्रात जाऊन गावरान प्रकारातील जेवण आणि हुरड्याचा आस्वाद घेत आहेत. साधारणतःनोव्हेंबरच्या अखेरीस शेतात कोवळी ज्वारी दिसायला लागते आणि हुरड्याची चाहूल लागते.

फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत हुरडा खायला मिळतो. नगरमधील काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक आपल्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या, दुधवाल्यांच्या शेतात हुरडा खाण्यासाठी जात होते. पण शहरात राहणाऱ्या नागरिकांना हा आनंद आता घेता येत नव्हता.

अलीकडे मात्र काही शेतकऱ्यांनी व कृषि पर्यटन केंद्रांनी हुरडा पार्टी सुरू केल्या आहेत. बाजारातही हुरड्याची पाकिटे विक्रीसाठी आली आहेत. त्यामुळे पर्यटकांची क्रेझ वाढली आहे. ग्रामीण भागातील जीवनशैली आणि जेवणाबद्दल शहरातील लोकांना आकर्षण आहे.

त्यामुळे साईबनमध्ये हे दोन्ही आहे, तसेच मुलांना आकर्षित करणारी सर्व प्रकारची खेळणी व मनोरंजन करणारे प्राणी, आंब्याच्या झाडाखाली वन भोजनाचा सुखद आनंद घेण्यापूर्वी लुसलुशीत गरमागरम हुरडा, चटण्या, गुडीशेव, रेवडी गोड आंबट बोरे, पेरूच्या फोडी व उसाचा रस देखील आहे.

साईबांमध्ये हुरडा पार्टीची मजा म्हणजे अनोखा आनंद माळरानावर अवतरलेला संपूर्ण स्वर्गच आपल्या हाती आला कि काय, असे वाटू लागते. तसे पहिले तर यावर्षी पीक कमी निघाले, त्यामुळे मोजक्या ठिकाणीच हुरडा उपलब्ध होता.

त्यातही साईबन मध्ये सर्वप्रथम सुरु होऊन सर्वात शेवटी संपणार आहे, दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात साईबनमध्ये पहिल्या दिवशी पासूनच नगरकरांनी पसंती दिली आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !