नाशिक : येथील सेंट झेव्हियर्स ग्रुप ऑफ स्कूल च्या वतीने आज नाशिक येथे आयोजित रेयान मिनिथोन 2023-24 ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तिडके कॉलनीतील अनंत कान्हेरे मैदान येथून मिनिथोन ला सुरुवात झाली. चांडक चौक, मुंबई नाका, सारडा सर्कल, एलआयसी ऑफिस व पुन्हा तिडके कॉलनी या मार्गाने स्पर्धक धावले.
अंडर 12, 14 व 16 या वयोगटातील विद्यार्थी स्पर्धकांनी 4 किलो मिटर, 6 व 8 किलो मिटर अशा वेगवेगळ्या अंतराची स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
तब्बल 3 हजार स्पर्धक धावले शहरातील तिडके कॉलनी व राणे नगर येथील सेंट फ्रान्सिस स्कूल, नाशिक रोड येथील रेयान इंटरनॅशनल स्कूल आणि ओझर येथील रेयान सीबीएससी स्कूल मधील तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांसह विविध संघटना या मिनिथोन मध्ये सहभागी झाल्या.विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी आलेल्या पालकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे तिडके कॉलनी परिसर आज पहाटेपासूनच गजबजून गेला होता.
स्पर्धा यशस्वितेसाठी सेंट झेवियर्स नाशिक मधील चारही स्कूल मधील मॅनेजमेंट बॉडी, प्रिन्सिपॉल, क्लिरिकल स्टाफ, शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेची सुरुवात ते शेवट पर्यंतच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुरक्षा कवच निर्माण केले होते. सर्व कर्मचारी पहाटे पासून ते स्पर्धा संपेपर्यंत उपस्थित होते. विद्यार्थी सुरक्षेची पूर्णतः काळजी घेण्यात आली.