येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
गौरव पठाडे (अहमदनगर) - मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शनिवारी (दि. 6 जानेवारी) पत्रकार दिन युवा पत्रकारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. याप्रसंगी युवा पत्रकारांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करीत त्यांना अभिवादन करण्यात आले.
सहा जानेवारी हा दिवस दरवर्षी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने यंदा पत्रकार दिन साधेपणाने साजरा करीत युवा पत्रकारांना प्रोत्साहन मिळावे, पत्रकारितेच्या क्षेत्राकडे जास्तीतजास्त तरुणांनी यावे, यासाठी त्यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये हा दिवस साजरा करण्यात आला.
परिषदेच्या अहमदनगर येथील कार्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पत्रकार महेश पटारे, अशोक परुडे, मुकुंद भालेराव, अनिरुद्ध तिडके, कुलदीप कुलकर्णी, गिरीश रासकर, अनिकेत यादव, मंजू भागानगरे, मोहसीन खान आदी युवा पत्रकारांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या सर्वांनी पत्रकारिता करताना येणाऱे अनुभव सांगितले. मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख आदींची यावेळी उपस्थिती होती.