महान व्यक्तीमत्त्व अशीच घडत नसतात. त्यासाठी..


महान व्यक्तीमत्त्व अशीच घडत नसतात. त्यांनी आत्मशोध घेतलेला असतो दुःख नैराश्य, मोह या गोष्टी बाजूला सारून त्या पुढे आलेल्या असतात. जीवनात संवेदनशील असणं फार जास्त गरजेचे आहे.


आपल्यातली संवेदनशील वृत्ती आपल्या कार्यात विशेषता निर्माण करत असते. परिस्थिती प्रतिकूल असताना मनाला शांत ठेवून  कार्यात मग्न राहणे फार मोठे आव्हान असते ज्यांना हे जमते, त्यांचा प्रवास लौकिकतेच्या पलीकडचा, म्हणजे अलौकिक असतो.

तोकड्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आणि कोणत्या नाही हे ठरवण्याचा स्वातंत्र्य आपल्याला असतं तेव्हा आपला प्राधान्यक्रम ठरवून आपला प्रत्येक क्षण आपण कारणी लावला पाहिजे.

जीवन प्रवासात सहजशक्तीची फार मोठी भूमिका येते अपमान, निंदा, अपयश, दुःख हे सगळं पचवण्याची सहनशक्ती असणे, म्हणजे एखाद्या शस्त्रापेक्षा कमी नाही. होय शस्त्र हे फक्त हातात घेतली जात नाही, ते अंगभूतही असतात.

तसेच सहनशक्तीचे शस्त्र आपल्या मधील अफाट शक्ति वाढवून मनाला अविचारांपासून सुरक्षित ठेवते. शिकत राहण्याची वृत्ती  आपल्याला ज्ञानी बनवते. म्हणुन सतत शिकत राहिले पाहिजे.

जीवन हे अफाट रहस्यांनी भरलेले आहे जीवनाला प्रस्थापित चाकोरी मध्ये बंद न ठेवता व्यापक मार्ग दाखवला पाहिजे.

- शुभांगी माने (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !