अहमदनगर - राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील कोरठण येथील खंडोबाच्या यात्रोत्सवास बुधवार दि. १७ जानेवारी पासून अखंड हरिनाम सप्ताहाने प्रारंभ होत आहे. १७ ते २४ जानेवारी दरम्यान विविध कीर्तनकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.
मुख्य यात्रा दि. २५ ते २७ जानेवारी दरम्यान होणार आहे. वैकुंठवासी तुकाराम महाराज शास्त्री यांच्या प्रेरणेने व डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे नियोजन करण्यात आल्याचे देवस्थानच्या अध्यक्षा शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, विश्वस्त राजेंद्र चौधरी यांनी सांगितले आहे
या सप्ताहात बुधवार दि. १७ जानेवारी रोजी बीड येथील संतोष महाराज वनव, दि.१८ जानेवारी रोजी किल्ले धारूर येथील विकास महाराज देवडे, दि. १९ रोजी भिगवण येथील विकास महाराज देवडे, दि. २० रोजी गेवराई येथील अक्रूर महाराज साखरे यांची कीर्तन सेवा पार पडणार आहे.
दि. २१ रोजी आष्टी येथील सुनील महाराज झांबरे, दि.२२ रोजी पैठण येथील शिवानंद महाराज शास्त्री, दि.२३ रोजी हिंगोली येथील सोपान महाराज सानप, तर दि.२४ जानेवारी रोजी सकाळी १० वा. परभणी येथील बाळू महाराज गिरगांवकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाची सांगता होईल.
या सप्ताहात दैनंदिन कार्यक्रम :
पहाटे ४ ते ६ - काकडा भजन
सायंकाळी ५ ते ६ - हरिपाठ
सायंकाळी ७ ते ९ - हरिकिर्तन
त्यानंतर महाप्रसाद व जागर
या सप्ताहाचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे. यापूर्वी वार्षिक यात्रोत्सवाच्या काळातच अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्याची परंपरा होती. मध्यंतरी चंपाषष्ठी उत्सवात सप्ताहाचे आयोजन करण्यात येत होते.
गावातील वारकरी सांप्रदायातील नाथ भांबरे, चेअरमन पोपट सुपेकर, बबन भांबरे, महादू घुले, मार्तंड जगताप यांच्यासह वारकरी सांप्रदायाच्या मागणीनुसार यंदापासून पुन्हा यात्रोत्सवात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, असे माजी सरपंच अशोक घुले म्हणाले.
या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन पांडुरंग गायकवाड, सचिव जालिंदर खोसे, खजिनदार तुकाराम जगताप, चिटणीस कमलेश घुले, अशोक घुले, विश्वस्त राजेंद्र चौधरी, चंद्रभान ठुबे, सुवर्णा धाडगे, सुरेश फापाळे, रामदास मुळे, महादेव पुंडे, धौडीभाऊ जगताप, दिलीप घुले यांनी केले आहे.