अहमदनगर - सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरात ६० दिवसांच्या मंडल, मकर पूजा उत्सवाची सांगता मकर वीलक्कु उत्सवाने झाली. या निम्मिताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर दोन महिने रोज पूजा, महाप्रसाद संपन्न झाला.
भाविकाची श्रद्धा असलेले अय्यप्पाचे मंदिर केरळमधील शबरीमळा येथे असून त्या मुख्य उत्सवाचा धर्तीवर नगरमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवानिम्मित पहाटे महागणपती हवन करण्यात येऊन संध्या श्रमिकनगर मधील बालाजी मंदिर ते अय्यप्पा मंदिर अशी सावेडीतून भव्य शोभायात्रा (तालापोल्ली) काढण्यत आली.
महिला मोती कलरच्या साड्या परिधान करून हातात फुलांनी सजवलेली छोटे ताट व त्यामध्ये अर्धा नारळात दिवा असतो. ही तालापोल्ली पाहण्यासाठी नागरिकानी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. तर मंदीर परिसर फुलांनी व दिव्यांनी सजविण्यात आले होते. संध्याकाळी ७ वाजता दीपआराधना करण्यात येऊन देवाची आरती व पुष्पभिषेक करण्यात आला.
यावेळी ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष के के शेट्टी व विश्वस्त, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, आदी मान्यवरांसह भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. नंतर भाविकांना महाप्रसाद (गोड जेवण) देण्यात आले व ६० दिवसाच्या उत्सवाची सांगता झाली.