आठरे पाटील पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


अहमदनगर - सावेडी विभागातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या वसतिगृहात्मक इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व पारंपारिक पध्दतीने पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे  म्हणून आंतरराष्ट्रीय गोल्फ खेळाडू  गुरकी शेरगील हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी त्याच्या हस्ते माजी खासदार चंद्रभान आठरे पाटील व शाळेचे माजी प्राचार्य व शैक्षणिक सल्लागार स्व. विलासराव आठरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने स्नेहसंमेलनाचे उ‌द्घाटन झाले.
     
अश्वपथक, एन.सी.सी., स्काऊट गाईड व हाऊसच्या विद्यार्थ्यांनी बँडपथकाच्या निनादावर संचलन करून मानवंदना दिली. यावेळी प्रमुख अतिथींचे स्वागत संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अॅड. विश्वासराव आठरे यांनी केले. तर संस्थेच्या विश्वस्त डॉ. आदिती आठरे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.

चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे यांनी शाळेतील अ‌द्ययावत सुविधांची माहिती सांगून अशा विविध  सुविधा देणारी ही एकमेव शाळा आहे. तसेच शालेय अभ्यासाच्या प्रगतीबरोबरच इतर बहिस्थः परीक्षा व उपक्रमात विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतात, असे सांगितले.

शाळेची विद्यार्थिनी प्रमुख मनुज देशमुख आणि समिक्षा लाड यांनी सन शाळेचे गुणवंत विद्यार्थी, मैदानी क्रीडा प्रकारात जिल्हा, राज्य स्तरावर विद्यार्थी खेळाडूंनी मिळविलेले यश, शालेय स्पर्धा परीक्षा, विविध प्रदर्शनातील गुणवंत विद्यार्थी आणि उपक्रमांची माहिती सांगून शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. 

गुरकी शेरगील यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलागुणांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यकितमत्व विकासासाठी अभ्यास, खेळ, शिस्त या गोष्टीकडे लक्ष देण्याचे आवाहन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या शुभहस्ते वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध शालेय व बहिस्थः परीक्षा व क्रीडा स्पर्धा उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी खेळाडूंना पारितोषिके, स्मृतिचिन्ह व पदके देऊन गौरविण्यात आले.

शाळेच्या विद्यार्थ्यांनी मैदानी क्रीडा प्रकारात कवायत, लेझीम, झांज, रोप मल्लखांब, कराटे, घोडेस्वारी, जिम्नॅस्टिकचे विविध क्रीडा प्रकारांची रोमांचक प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

सांस्कृतिक कार्यक्रमात विविध नृत्य व लोककला, देशभक्तीपर नृत्य पारंपरिक वेशभूषेत सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. आभार संस्थेचे विश्वस्त मानसिंग आठरे पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

मैदानी क्रीडा प्रकारांचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका स्नेहल वाघमारे, धनश्री पेहरे व प्रीती क्षीरसागर यांनी केले. यावेळी पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !