नाशिक : येथील दिंडोरी रोडवरील श्रीमान सत्यशोधक प्रतिष्ठान तर्फे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्याकाळी शिक्षण प्रसार करताना सावित्रीमाई यांना शेण फेकून मारलं गेलं, पण त्यांनी चंदन म्हणून ते स्वीकारलं. त्यांच्या कार्याचा बहिष्कार करण्यात आला, परंतु त्यांनी कधी तिरस्कार केला नाही. प्रसंगी दगडगोटे मारले, मात्र त्यांनी नेहमीच त्या बदल्यात वैचारिक फुले दिलीत, असे प्रतिपादन विनायक खोडे यांनी केले.
यावेळी प्रस्तावना दीपक बच्छाव यांनी केली. आतापर्यंतचे संघटनेचे कामकाज आणि कार्यक्रमाची रूपरेषा शिवदास तिडके यांनी मांडली.
कार्यक्रमास सागर मोरे, राजेंद्र बागुल, प्रतिभा गांगुर्डे, पूनम तिडके, भगवान पाटील, डॉ देवराम खैरनार ,रवींद्र वाघ, मच्छिंद्र खोडे, सूर्यभान खोडे, भरत राजकुळे, बापू अहिरे, उज्वला बच्छाव आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन वंदना बागुल यांनी केले. आभार महिला अध्यक्षा राजश्री गायकवाड यांनी मानले.