शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांना राष्ट्रीय उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार जाहीर


गौरव पठाडे (अहमदनगर) - छावा प्रतिष्ठान मुंबई  महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार राहुरी येथील शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांना जाहीर झाला आहे. समितीचे कार्याध्यक्ष वस्ताद अमित गुंडाकुश यांनी ही माहिती दिली आहे. हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्रातील फक्त दोनच व्यक्तींना दिला जातो.

दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता  वाजता मराठी साहित्य संघ सभागृह नवी मुंबई येथे एका समारंभात निवृत्त ब्रिगेडियर मेजर सुधीर सावंत व  मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांनी शाहिरीतून व कीर्तनातून शिवरायांचे कार्य महाराष्ट्रात देशात तसेच परदेशातही पोहोचवले आहे. तसेच सिन्नर येथे अंध अपंग निराधार इत्यादी समाजातील दुर्लक्षिलेल्या घटकांसाठी शिवाश्रमाची बांधणी करून लोकार्पण केले आहे.

या कार्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली आहे. शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांचे आकाशवाणी दूरदर्शन तसेच इतर खाजगी वाहिन्यावर नेहमीच कार्यक्रम होत असतात. तरुणांसाठी त्यांनी ऑनलाइन यशाचा महामंत्र शिवतंत्र कोर्सची निर्मिती केली आहे. शेकडो तरुण याचा फायदा घेत आहेत.

छत्रपतींच्या चरित्रातून आजच्या तरुणांनी यशस्वी कसे व्हायचे हे या कोर्समध्ये शिकवले जाते. त्यांच्या वेबसाईट मुळे जगभरातील मराठी माणसांपर्यंत ही माहिती पोहोचली आहे. यापूर्वी शिवशाहीर विजय तनपुरे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

त्यांच्या या कार्याबद्दल दिल्ली विद्यापीठाने तीन वर्षांपूर्वी त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मान केला आहे. आपले गेले काय त्यापेक्षा आपल्याकडे काय शिल्लक आहे, याचा विचार केला तर जीवनामध्ये यश निश्चितच मिळते, असा मूलमंत्र ते तरुणांना सातत्याने देत असतात.

राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिवशाहीर विजय तनपुरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !