गौरव पठाडे (अहमदनगर) - पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदीरात चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणुन सुमारे १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल एमआयडीसी पोलीसांनी जप्त केला आहे.
दिनांक ३ डिसेंबर रोजी श्रीकृष्ण बबन रायकर (वय-३४, वर्ष, रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अहमदनगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दिनांक २ डिसेंबर रोजी रात्रीचे सुमारास पिंपळगाव माळवी येथील संत सावता महाराज मंदीरातील विठ्ठल रुख्मीनीच्या डोक्यातील मुकुट व रुख्मीणीच्या गळ्यातील मणीमंगळ सुत्रातील सोण्याचे ४ मणी असा ६ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, हा गुन्हा राहुल नानासाहेब शिंदे (वय २४) व कुणाल विजय बनसोडे (वय २३ वर्ष, दोघे राहणार वडगाव गुप्ता, नगर) यांनी केला आहे.
तसेच ते सध्या वडगाव गुप्ता येथे आहेत. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना वडगाव येथे पाठविले. पोलीस पथकांनी बडगाव गुप्ता येथुन आरोपीना सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले. त्यांची नावे राहुल नानासाहेब शिंदे व कुणाल विजय बनसोडे होती.
दोन्ही आरोपीनी गुन्ह्याची कबुली दिली असुन त्यांचेकडे एक नटराज देवताची मृती मिळुन आली. तसेच त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबुल आहे. तसेच त्यांनी नटराजची मूर्ती कोठुन आणली याबाबत त्यांना काहीएक सांगता आले नाही. त्यामुळे त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी राहुल नानासाहेब शिंदे याचेवर तीन तर कुणाल विजय बनसोडे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी संपत भोसले, यांचे मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर सांगळे, पोलिस नाईक राजु सुद्रीक, विष्णु भागवत, मिसाळ, किशोर जाधव, सुरेश सानप, नवनाथ दहिफळे, सुरज देशमुख, यांचे पथकाने केली आहे.