कॅम्प ! इथला बाज.. अन इथली शान...!


परवा पुण्यात होतो, रात्री मित्र फारुख सोबत कॅम्प भागात (लष्कर) फेरफटका मारायला आलो होतो. खरेतर हा रस्ता ब्रिटिश काळापासून वर्दळीचा, अगदी तेव्हापासून या रस्त्याची वेगळीच प्रतिष्ठा, आदब... 

इथे फेरफटका मारणं, खरेदी करणं.. हॉटेल मधे बसुन जिभेचे चोचले पुरवणं... यासारखी मजा नाही... इथला बाजार, इथली वर्दळ अनुभवण्यासारखा आनंद काही औरच असतो.. इथले प्रशस्त रस्ते अगदी इंग्रजांपासून निर्माण झाले आहेत. म्हणुन इथे कदाचित वाहतुकीची कोंडी होत नसेल.

प्रमुख रस्त्यावरून फिरताना जरा कडेच्या घरांकडे नजर टाकली तर अनेक सुंदर इमारती स्वातंत्र्यपूर्व काळापासून असल्याची जाणवतात. यावरून त्या काळी या समृद्ध रस्त्याची स्वतःची गरिमा काय ताकदीची असेल...

अनेक प्रतिष्ठेची दुकाने आपली स्वतःची ओळख सांभाळून येथे व्यवसाय करतात. तेव्हापासून नांदत असलेली येथील संस्कृती आजही येथे जाणवते.

रात्रीचे ११ वाजले होते. दुकाने बंद करण्याची वेळ असल्यामुळे बहुतेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने वाढवली होती.. त्यामुळे थोडी सामसूम... तरीही काही फूड पॉईंट व आइसक्रीम शॉप येथे खवय्यांची वर्दळ होती.

लोकं आपल्या कुटुंबीय, मित्रमंडळी सोबत छान गप्पा मारत आइसक्रीम, कुल्फीचा आनंद घेत येथे घेत होती.
एकतर काही दुकानांचे शटर बंद होण्याची वेळ व त्याचं वेळी झालेली गर्दी...

खरतर दिवस भर दमलेला जीव ताजातवाना व्हावा अशी आपली इच्छा असते म्हणूनच, या महानगरीत अनेकजण कुटुंबीया बरोबर स्ट्रीट फूडचा छान आनंद येथे घेत असतात.

मजा आली. त्यात दिवाळीचे दिवसांचं वातावरण... इथेच थांबून रहावं असं वाटावं.. आमची पिढी खरेच नशीबवान असेल... ही शेवटची पिढी असेल ज्यांनी ट्रात्झिस्टर ऐकला, गुलजार, जगजीत, किशोर, लताची गाणी मन लावून एन्जॉय केली...


असो, यदाकदाचित हेही सोनेरी सूख असेल आपल्यासाठी. रस्त्यावरची वर्दळ, आपला जुना बाज सांभाळून व्यवसाय करणारे हॉटेल्स, इथली संस्कृती अजून काही वर्षांनी अशी अनुभवयाला मिळेल का..?

की होईल इथेही एखादा ब्रिज.. अन् घालवून टाकेल इथल्या रस्त्यांचं सौंदर्य.. अन् दुकानांचेही... होईल का अशी रात्रीची गर्दी, अन् दिपवून टाकेल इथला बाज... इथली शान...!

- जयंत येलुलकर (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !