हा माझा, तो माझा
किती लोकांना आपली माणसे समजतो आपण..
तुमच्या हातात जोपर्यंत आहे,
तुम्ही एखाद्याच्या फायद्याचा माणूस आहात,
मग तुम्हाला रोज सलाम...
एकदा का त्याची गाडी पुढे निघाली,
मग हॉर्न दिला तरी थांबणार नाही...
हे असंच असतं मित्रा,
अवती भोवती फिरणारी माणसे
सगळीच तुमची नसतात,
त्यात संधीसाधुच जास्त असतात
ज्याला जीव लावाल,
तो अनुभव देईल,
दुनियादारीचा अर्थ समजू लागेल तुम्हाला..
पुढे त्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसतं..
तो गरजू..
तो लाचार,
तो उभा हात जोडून..
पळा त्याच्यासाठी,
त्याच्या कामात आनंद..
तोपर्यंत तुम्ही
असंच असतं...
तुम्हाला मात्र समजत नसतं..
तरीही,
यातच मजा आहे मित्रा
कुणाचं सुख कशात असतं
चेहऱ्यावरचा आनंद टिपून घे,
याची गोडी कशात नसेल..
कलियुग आहे म्हणुन काय झालं
आपण सतयुगात जगायचं...
वाऱ्याची झुळूक तिथेच आहे..
हळुवार....!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)