'ही' माणसे गावाच्या पडझडीस कारणीभूत असतात..


'राजकीय क्षेत्र' व त्यातील सर्व पक्षीय पुढारी हे तुमच्या परिसराच्या विकासाचा महत्वाचा केंद्रंबिंदू असतात. या भागाचं प्रतिनिधित्व असणाऱ्या नेत्यांमध्ये वैचारिक बैठक असणं महत्वाचं असतं.


नाहीतर तो आला.. त्यानं पाहिलं.. अन् तो गेला.. तुम्ही मात्र बघतच राहिले.. अशी तुमची अवस्था झाली की समजायचं, हे विचार शून्य असलेल्या लोकांचं गावं आहे..

अशा गावातील लोकांना त्यांच्या भागाच्या सार्वजनिक सुविधांपेक्षा तो नेता काय खातो, कोणते कपडे घालतो, कोणत्या गाडीत फिरतो.. यासारख्या गप्पा चघळण्यात रस असणाऱ्यांचं हे गाव आहे. 

हेही समजायचं की इथल्या 'अनेक' लोकांना मतदानावेळी शे पाचशे घेण्यात रस असतो.. विकासाशी यांना काहीही देणं घेणं नसतं. या लोकांना नेत्याच्या पुढे नतमस्तक होण्यातच मोठा आनंद असतो.

नेत्याच्या मागे चमचेगिरी करणारी अक्कल शून्य माणसे प्रामुख्याने गावाच्या पडझडीस कारणीभूत असतात. अन्  आपल्याला ती खुप भारी वाटतात.

- जयंत येलुलकर (अहमदनगर)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !