मुली सुंदर असतात
चेहरा, शरीर याने तिचं
सौंदर्य असतं असं नाही...
ती कधी शिक्षण सोडून
मुलांचा पाठलाग करताना दिसत नाही...!
नकार आला म्हणून मुलांच्या
तोंडावर ॲसिड हल्ला करत नाही...!
संबंध तुटल्याने तुझे
व्हिडिओ व्हायरल करेन
अशा धमक्याही देत नाही..!
जाता येता मुलांवर फालतू,
अश्लील कमेंट करताना दिसत नाही.
लग्नानंतर छोट्या छोट्या गोष्टींसाठी
पतीवर हात उचलत नाही....!
चुपचाप अन्याय सहन करत रहाते,
नाती जपावी म्हणून
मातीत मिसळून जाते....
समतेची वाट पहात रहाते....!
तरीही खलनायिका म्हणून
ती बदनाम होते....
फालतू विनोदात कशी ती कजाग
असते..?
खरंतर मुली निखळ असतात मनाने,
म्हणून त्या साऱ्याजणी सुंदर असतात.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)