ब्रँडेड वस्तू खरेदी, मुलांसाठी तर ब्रँडेड खेळणी घेण्याचा काहींचा अट्टाहास असतो. या साऱ्यांपेक्षा जत्रेत खरेदी करण्याची मजा काही औरच असते. हे ज्याला कळलं त्याला जगण्याचा अर्थ समजला.
फाईव्ह स्टार हॉटेलमधे चहा घेण्यापेक्षा चहाच्या टपरीवर बसुन चहा पिण्याची मजा काय असते. हे ज्यानं अनुभवलं, तोच याची गोडी काय असते हे सांगु शकेल. शेवटी स्वतःचा आनंद जास्त महत्वाचा.
आज मित्रांसोबत मोहटा देवी गडावर देवी दर्शनाला आलो असता जत्रेत थाटलेली दुकाने पाहत फिरतानाचा आनंद वेगळा होता. आई बाबांनी बोटं धरून जत्रेतल्या दुकानात घेतलेल्या खेळण्यावर आपलं बालपण समृद्ध झालं.
म्हणुन तर सारखं सारखं डोळ्यांसमोर येतं. पावसाच्या थेंबात न्हाऊन सुगंधित झालेल्या त्या साऱ्या क्षणांना सलाम...!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)