ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने केला अटकपूर्व जामीन मंजुर


औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात एका आरोपीला अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. या प्रकरणात ऍड. योगेश राजेंद्र नेब यांनी आरोपीतर्फे उच्च न्यायालयात बाजू मांडली.


अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील प्रशांत मच्छिंद्र कुऱ्हे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ मे २०२३ रोजी फेटाळला होता.

या प्रकरणात अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ (ॲट्रॉसिटी) कलम ३ (१) (४), ३ (१) (एस) व भारतीय दंड संहिता कलम ३२३, ५०४ व ५०६ अन्वये शनिशिंगणापूर पोलिस स्टेशनमध्ये दि. २४ एप्रिल २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणात आरोपीने ऍड. योगेश राजेंद्र नेब यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अपील दाखल केले होते. हा गुन्हा दाखल करण्यात झालेला अमर्याद विलंब, तपासात आढळलेल्या त्रुटी, सर्व आरोपींवर केलेले एकसारखे आरोप हे सर्व युक्तीवाद न्यायालयाने मान्य केले व आरोपीला दि. २० जून रोजी अटकपूर्व जामीन मंजुर केला.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !