आमदार शंकरराव गडाखांनी नाभिक समाजाला दिली 'ही' ग्वाही


अहमदनगर - नाभिक समाजाला एसस्सी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी आपण विधासभेपर्यंत नक्की नेऊ. तसेच आपण नाभिक समाजाच्या कायम पाठीशी उभे असल्याचे आश्वासन, नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी दिले आहे.

नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीत आमदार गडाख यांनी नगरमध्ये सुरु असलेल्या उपोषणाला पाठींबा जाहिर केला. सोनई नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार शंकरराव गडाख यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली.

या भेटीच्या वेळी सोनई परिसर नाभिक संघटनेचे अध्यक्ष अविनाश राऊत यांनी नाभिक समाजाला एस. सी. प्रवर्गात समाविष्ट करण्याचे निवेदन आमदार शंकरराव गडाख यांना दिले. तसेच समाजाच्या वतीने या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठविण्याची विनंती केली.

त्यावर आमदार गडाख यांनी आपण कायम नाभिक समाजाच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. नगरमध्ये सुरु असलेल्या समाजाच्या उपोषणाचीही त्यांनी माहिती घेतली. नाभिक समाज हा वर्षानुवर्षे दारिद्र्यात आहे, असे ते म्हणाले.

कोरोना कालावधीत गेल्या तीन वर्षांत समाजाने अतोनात दुःख सोसले. त्यामुळे या समाजाची एससी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी रास्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच उपोषणास पाठींबा जाहिर केला. नाभिक समाजाचे निवेदन स्विकारत सर्व प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सचिन वाघमारे, तात्यासाहेब कोरडे, श्रीराम दळवी, आबासाहेब भागवत, अमोल कोरडे, नंदकुमार औटी, संतोष दुधाडे, अमोल भागवत, काकासाहेब कोरडे, दत्तात्रेय बिडे, वसंत भागवत, अतुल राऊत यांच्यासह इतर नाभिक समाजबांधव उपस्थित होते.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !