अहमदनगर : नेवासा तालुक्यातील खुपटी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न असलेल्या सोनई कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी खुपटी येथे आगमन झाले आहे.
यावेळी खुपटीचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच व सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. प्रा. डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य सुनील बोरुडे, कार्यक्रम अधिकारी एस. ई. गायकवाड, कार्यक्रम समन्वयक ए. डी. दरंदले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
कृषिदूत प्रथमेश विनोद धुमाळे, वैष्णव भरत दौंडकर, प्रथमेश बाळासाहेब भजनावळे, वैभव विष्णू जगताप, वरूण नानासाहेब गुंजाळ, प्रणव नरेंद्र भोय इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यांच्या कालावधीत कृषी जागरूकता आणि कृषी उद्योग कार्यानुभव कार्यक्रम राबवला जाणार आहे.
यामध्ये गावातील पीक पद्धती, आधुनिक शेती, शेतकऱ्यांना वित्तीय पुरवठा, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, किड रोग नियंत्रण याविषयी कृषिदुत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. खुपटी ग्रामस्थांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले आहे.