केंद्रीय रिझर्व पोलिस दलाचे उपायुक्त अमित प्रकाश शनिदरबारी

                                   
सोनई (अहमदनगर) - केंद्रीय रिझर्व पोलिस दलाचे पोलिस उपायुक्त अमित प्रकाश यांनी आपल्या कुटूंबातील सदस्यांसह शनी शिंगणापूरात येऊन शनी देवांचे दर्शन घेतले.

यावेळी आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने मंडळांचे सदस्य संतोष तेलोरे आणि राजाभाऊ बोरुडे यांनी देवस्थान अतिथीगृहात त्यांचा सन्मान केला व शनिदेवाची व देवस्थान परिसरातील विकास कामे राबविण्यात असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी दोन तीन वर्षांपुर्वी आपण येथे आलो होतो, शनि देवाचे महत्त्व आपण ऐकुन होतो. शनिशिंगणापूर हे मुलखावेगळे गाव असुन येथील घराला दरवाजे नाहीत हे विशेष आहे, असे सांगितले.

तसेच या ठिकाणी चोरी सुद्धा होत नाही, देशातील हे पहिलेच गाव असावे. येथील परिसर पाहुन येथे पुन्हा पुन्हा यावे, असे वाटते. देवस्थान मार्फत राबविण्यात असलेल्या योजनांची माहिती तेलोरे यांनी त्यांना दिली. यावेळी त्यांच्याबरोबर दिनेश वाघ (इंटेलिजन्स ब्युरो नवी मुंबईचे सदस्य) हे सुद्धा उपस्थित होते.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !