अहमदनगर - भविष्यकाळ सुरक्षित करण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे, असे प्रतिपादन महानगर पालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी केले.
स्नेहबंध सोशल फाउंडेशन तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज मनपा प्राथमिक शाळा, भूतकरवाडी येथे आयुक्त पंकज जावळे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, मुख्याध्यापक अरुण पवार, सहशिक्षिका ज्योती टाळके आदी उपस्थित होते. आयुक्त जावळे म्हणाले, घराच्या जवळ, घराच्या गल्लीमध्ये, गार्डनमध्ये, रस्त्याच्या दुतर्फा जिथे जागा असेल तेथे झाडे लावा.
या मोहिमेत सहभागी व्हा. नुसते झाडे लावून भागणार नाही, तर ती जगवणे आणि त्यांचे संर्वधन करणेही गरजेचे आहे. यामुळे निसर्गामध्ये संतुलन राखला जाईल आणि आपला उद्याचा काळ सुरक्षित होईल.
यावेळी स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, अहमदनगर जिल्हयामधे यावर्षीही जास्त झाडे लावू आणि वृक्षरोपणामध्ये अहमदनगर जिल्हा इतरांसाठी एक आदर्श म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.