नेवाशात संगणक टायपिंग परीक्षेसाठी 'डमी उमेदवार', नऊ जणांवर गुन्हा दाखल


अहमदनगर - महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या संगणक टायपिंग परिक्षेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या परीक्षेसाठी नेवासे शहरातील ज्ञानोदय इंग्लिश स्कुल केंद्रात ८ जण अनधिकृतपणे आढळून आले. तर एक जण चक्क दुसऱ्या उमेदवाराच्या जागी परीक्षा देण्यासाठी आलेला आढळला. याप्रकरणी ९ जणांवर नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नेवासा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब रावसाहेब जगताप (वय ५७ वर्षे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार १२ जुलै ते २८ जुलैपर्यंत महाराष्ट्र शिक्षण परिषडेच्या वतीने घेण्यात येणारी संगणक टायपिंग परिक्षा चालु होती.

या परिक्षेकरीता जगताप यांना केंद्र संचालक म्हणुन नेमण्यात आलेले होते. दि. २४ जुलै रोजी मराठी कॉम्युटर टायपिंगचे तीन पेपर होते. सकाळी ९ ते साडेदहा वाजेपर्यंत पहिला, ११ ते साडेबारा वाजेपर्यंत दुसरा व दीड ते साडेतीन वाजेपर्यंत तिसरा पेपर होता.

ज्ञानोदय इंग्लिश स्कुल नेवासा खुर्द ता. नेवासा केंद्रावर पहिले दोन पेपर संपले होते व मधली सुट्टी चालु होती. महाराष्ट्र शिक्षण परिषद आयुक्त नंदकुमार बेडसे यांनी केंद्रावर भेट दिली, त्यावेळी त्यांना परिक्षा केंद्रावर काही डमी उमेदवार आढळले. 

प्रकाश मंडलीक (क्लासीक कॉम्युटर्स टायपिंग सोनई), शरद जाधव (महाराष्ट्र कॉम्युटर्स टायपिंग सोनई), ऋषीकेश खेडकर (यश टायपिंग कॉम्युटर्स माका), शेख आशाबी (श्रीनाथ कॉम्युटर्स टायपिंग नेवासा फाटा), दत्ता हापसे (महाराष्ट्र कॉम्युटर्स टायपिंग सोनई), रुपाली पंडुरे (श्रीनाथ कॉम्युटर्स टायपिंग नेवासा फाटा), मारिया गायकवाड (त्रिमुर्ती कॉम्युटर्स टायपिंग नेवासा), कल्पना मंडलीक (क्लासिक कॉम्युटर्स टायपिंग सोनई) हे अनाधिकृतपणे परिक्षा केंद्रात आढळले. तर रविराज बाळासाहेब भुसारी (रा. राहूरी रोड, प्रशांतनगर, सोनई, ता. नेवासा) हा महाराष्ट्र कॉम्युटर्स इन्सिट्युटतर्फे ऋषीकेश दरेकर (ह.मु. सोनई, ता. नेवासा) याचे जागेवर परिक्षेसाठी अनाधिकृतपणे बसलेला आढळुन आला.

हे सर्व जण आढळून आले, तोवर परिक्षा सुरू झालेली नव्हती, तसेच कॉम्युटर्स लॉग ईन करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे शिक्षण विस्तार अधिकारी जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासे पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !