अहमदनगर - यशवंतराव चव्हाण विद्यापीठ अंतर्गत नुकत्याच घेण्यात आलेल्या बॅचलर ऑफ जर्नालिझम या परीक्षेत सरस्वतीभवन कला व वाणिज्य महाविद्यालय संभाजीनगर या केंद्रातून अनिल तुकाराम येळवंडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
नेवासा तालुक्यातील सोनई (हनुमानवाडी) गावातील रहिवासी असलेल्या अनिल येळवंडे यांनी सोनई येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेतलेले आहे.
त्यांना केंद्र संचालक तृप्ती रोंघे मॅडम, डॉ शौकत फकीर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बॅचलर ऑफ जर्नालिझम मध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्यांचे मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच नेवासा तालुका पत्रकार संघ, वकील संघ व परिसरातील ग्रामस्थांकडून त्यांचे या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.