युनिक ब्रेन अॅकॅडमीचे संस्थापक तथा MBP Live24 माध्यम समुहाचे मुख्य संपादक अॅडव्होकेट उमेश सुरेशराव अनपट यांच्यासह त्यांच्या पत्नी तथा युनिक ब्रेन अॅकॅडमीच्या डायरेक्टर स्वामिनी उमेश अनपट त्यांची कन्या यशांजली उमेश अनपट व चार वर्षांचा मुलगा सुर्यांश उमेश अनपट यांनी ही अतुलनीय कामगिरी केली आहे.
नाशिकच्या जलतरण तलावामध्ये पोहण्यााचा सराव केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या स्विमिंग स्पर्धेत ही अनपट कुटुंबियांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे अवघ्या १३ दिवसांच्या सरावानंतर ही कामगिरी करण्यात त्यांना यश आले आहे. चौघांनीही वेगवेगळ्या गटात या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या जलतरण तलावाच्या इतिहासात अशी अतुलनीय काामगिरी करणारे हे एकमेव कुटुंब असल्याचे जीवरक्षक व व्यवस्थापक यांनी सांगितले आहे. अनपट यांच्या कुटुंबाचा जलतरण तलावाला मोठा अभिमान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.