येथे क्लिक करून आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहमदनगर - महाराष्ट्र स्टेट ज्युडिशिअल स्टेनोग्राफर संघटनेच्या अहमदनगर शाखेच्या रविवार (दि. २५) रोजी पार पडलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने रामेश्वर दशरथ बेल्हेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
उपाध्यक्षपदी संतोष लयचेट्टी तर सचिवपदी सतीश ढवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेचे पूर्वीचे अध्यक्ष गणेश सब्बन व सर्व न्यायालयीन लघुलेखक यांच्या वतीने ही निवड करण्यात आली आहे.
या कार्यकारणीमध्ये संगिता राणे, कविता वाव्हळ, रोहित हौडगे, पांडूरंग फोपसे, साजिद शेख, विठ्ठलराव दाळवाले, सविता टेमक, एस. पी. सांगळे, महेंद्र बोगा, सतीश सुपेकर यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी सेवानिवृत्त स्वीय सहाय्यक दत्तात्रय लोखंडे तसेच सेवानिवृत्त लघुलेखक उद्धव त्रिंबके, बी. पी. ढोकटे, वैशाली विटवेक यांचा सेवा गौरव करण्यात आला. त्यांच्या या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून स्वागत होत आहे.