आरटीओ अधिकाऱ्यांना धमकावले, खान व सानप या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

अहमदनगर - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक असलेल्या महिला अधिकारी यांना वाहनांवर कारवाई केल्याचा राग मनात धरुन धमकावणे शहरातील दोन ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना चांगलेच महागात पडले आहे. महिला अधिकारीच्या फिर्यादीवरुन फिरोज शफी खान व बाबासाहेब बलभीम सानप यांच्यावर कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

धमकावणे व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला रविवारी (दि. १४ मे रोजी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयेशा शेख या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटर वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. जनसेवा ट्रान्सपोर्टची वाहने भार क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक करत असल्याने वाहनांवर कारवाई केली होती.

यावेळी जनसेवा ट्रान्सपोर्टचे संचालक फिरोज शफी खान व बाबासाहेब बलभीम सानप यांच्यात बोलाचाली झाली. त्यानंतर त्यांनी पाहून घेऊ असा दम दिला होता. त्यानंतर ८ मे रोजी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त महालेखाकार कार्यालय कामकाज देण्यात आलेले होते. जनसेवा ट्रान्सपोर्टचे वाहनावर ओव्हरलोड बाबत रितसर कार्यवाही केली.

ही कारवाई केल्याचा राग मनात धरुन फिरोज खान व बाबासाहेब सानप कार्यालयात येऊन नोकरी घालवण्याची वारंवार धमक्या देत असल्याचा आरोप फिर्यादीने केलेला आहे. ८ मे रोजी खान व सानप यांच्यासह दोन ते तीन अज्ञात इसमांनी माझ्या कार्यालयातील केबीनमध्ये प्रवेश करुन कारवाई करायची नाही, अन्यथा तुमची नोकरी घालवू! अशा धमक्या दिल्या.

शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. तुमच्या विरुध्द वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारी मागे घ्यावयाच्या असतील तर तुम्हाला आमच्या सोबत तडजोड करुन पैसे दयावे लागतील तुम्ही आम्हास पैसे दिले नाही तर आंम्ही तुमच्या विरुध्द दिलेल्या तक्रारी मागे घेणार नाही, असे म्हणून तेथून निघून गेले. तर खाजगी वाहनावरील तात्पुरते चालक श्रीकांत गुंजाळ याचा छुपा पाठलाग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !