गोदावरीला 'जलपर्णी' मुक्त ठेवण्यासाठी एकजुट दाखवा - विभागीय आयुक्त

नाशिक - दुषित पाण्यामुळे जलपर्णी फोफावते. जलपर्णीच्या संकटाने नद्या प्रदूषित होत आहेत. जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्याची क्रिया मंदावते. शहराच्या व कारखान्याच्या सांडपाण्यातील व मलजल पाण्यातील दूषित घटक मिसळले की जलपर्णी वाढते.

दुषित घटक पाण्यात मिसळणे जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत जलपर्णीची वाढ अनिर्बंधपणे होत राहील. या जलपर्णीमुळे नदीची नेसर्गिक पर्यावरणीय व्यवस्थाही धोक्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीला जलपर्णी मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या.

गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी विभागीय आयुक्त ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन. डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपायुक्त (करमणुक शुल्क) राणी ताटे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गळ, उपस्थित होते.

तसेच स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे, याचिकाकर्ते निशोकांत पगारे, राजेश पंडीत आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, रामकुंडावरील क्राँक्रीटीकरण थांबविण्यात आले आहे.

महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त या संयुक्त बैठक घेऊन यावर उपाययोजना सुचवाव्यात. तसेच कुठलेही सांडपाणी नदीमध्ये जाणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे, असेही विभागीय आयुक्त गमे यावेळी म्हणाले.

या बैठकीत औद्योगिक क्षेत्रात काम करतांना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही किंवा प्रदूषण टाळून उद्योग चालविणाऱ्या शामला इलेक्ट्रा प्लाटर्स व एबीबी या औद्योगिक संस्थांचा सत्कार करण्यात आला.

तसेच शासकीय नोकरी करुन पर्यावरण व विजेची बचत करा असा संदेश आपल्या पाठीला लावून जनजागृती करणारे महावितरणचे कर्मचारी योगेश बर्वे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !