अहमदनगर - रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांना पुन्हा धमकीचे पत्र आले असून त्यामध्ये पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही बाब तिसऱ्यांदा घडली आहे. अद्यापही आरोपीचा शोध लागलेला नाही.
त्यांच्या जीविकास धोका आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध करत आरोपीचा तात्काळ शोध लावून अटक करण्यात यावी व गायकवाड यांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सुमेध गायकवाड, रिपब्लिकन पार्टीचे अजय साळवे, सदाशिव भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, वैभव जाधव, चंद्रकांत भिंगारदिवे, अनिकेत अल्हाट हे उपस्थित होते.
तसेच सुनील क्षेत्रे, महेश भोसले, बंटी भिंगारदिवे, अतुल भिंगारदिवे, पप्पू भिंगारदिवे, पवन भिंगारदिवे, किरण जाधव, अक्षय बोरुडे, यशोदास वाघमारे, बबलू भिंगारदिवे, अनिल ढेरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.