खुप सारी स्वप्नं..
कधी सत्यात उतरलेली,
काही रुतलेली, विरलेली,
विसरलेली...
दिवसामागून दिवस जात आहेत...
स्वप्न पाहतच आहोत...
जणु,
जिंकले मृत्यूला..
नाही शिवणार कधी तो आपल्याला..
हा तर थाट आहे..
काय घेऊ काय नको..
पारडे किती जड व्हावे ?
क्षणभंगुर आहे हे सारे...
मित्र चांगली हवीत,आपल्या पेक्षा बुद्धिमानप्रेम करणारी,भलं पाहणारी..एवढंच .दुसरं हवे तरी काय..?
सब झूठ..
बँक बॅलन्स..
जमीन जुमला..
यातच जीव अडकलाय..
काहीही नसतं,
आपली स्टेटजी कळायला हवी,आखायला हवी..सोडायचं आहे सारं..दोन वर्ष आठवणीं दाटून येतील...फुलांचा हार..चंदनाचा येईल हळूहळू मग..अडकायचं कुठे..
इगो, इर्षा, स्वार्थ..
नको आता मानगुटीवर..
मला माहित नाही,
पुढच्या जन्माची कहाणी..
जीवन हेच
आयुष्य हेच..
चला जगून तर घेऊ,
सगळी नाटकं सोडून...
परवा फाईव्ह स्टार मधली शाही डिशकशीबशी उतरवली..घरातली भाकरी, ठेचा अन् फोडलेला कांदा..या चवीनं लहानाचं मोठं केलं..हाच ठेवा..बाकी क्षणभंगुर आहे यार..
- जयंत येलुलकर (अहमदनगर)