पहाट किरणे..
नित्यनेमाने दिवस उजाडतो..
नवी स्वप्न, नव्या आशा..
ओंजळीभर देतो ..
डोळे मिटावे,
अंधुकश्या नजरेने आकाशाकडे पहात शून्यात..
सृष्टी, आकाश,
वर सारं त्यानेच व्यापलेलं..
कापसाचे पुंजके..
जगण्याचा प्रवास चालूच आहे..
इथून तिथे पोहोचण्याचा...
काल होता..
आज उजाडला..
तो ही काल होतोच आहे..
आजचा दिवस..
निसर्गाने वाढून ठेवलेली
मिष्टान्न भोजनाची थाळी आहे जणु..
दिवसांचा हा खेळ रोज असतो ..
कधी प्रखर उन,
कधी गारांचा पाऊस..
अवेळी जणु..
काठी टेकवत चालताना
कुणी म्हणावं चला हिमालयात ट्रॅकिंगला ...
प्रसन्न सकाळ...
निसर्गाची रेलचेल..
किलबिलाट
धावत्या झाडांचा
सारखा चुकत चाललेला हिशोब..
प्रश्न पडलेल्या चेहऱ्यावर
अनोळखी माणसांचं स्मित हास्य,
अन् उजाडलेली माझी
आणखी एक आशादायी सकाळ..
- जयंत येलुलकर (अहमदनगर)