अहमदनगर - नेवासा तालुक्यातील बेल्हेकरवाडी (रेणुकानगर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आणि शालेय विद्यार्थ्यांसोबत विधायक उपक्रम राबवण्यात आला.
देशभरात भीमजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना डीजे, फ्लेक्स या सर्वाला फाटा देऊन उद्योजक शांताराम देवतरसे यांनी गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देवून बेल्हेकरवाडी (रेणुकानगर) येथे हा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
देवतरसे म्हणाले, मुलांनी शिक्षण घेवून मोठे व्हावे आणि आई-वडिलांची सेवा करावी. यावेळी बेल्हेकरवाडीचे सरपंच संतोष शिंदे, उदय कर्डक, सुरेश वैरागर, पंडीत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब गायकवाड, उपस्थित होते.
तसेच यावेळी सागर कुरकुटे, योगेश तेलोर, ऋषी कदम, जयदीप शिंदे, संकेत शिंदे, ऋषीकेश शिंदे, शुभम शिंदे, बंडू शिंदे, शकील शेख, शिवाजी माने, विठ्ठल माने, सोमा जाधव, लखन साबळे, विलास शिंदे, मोजेश बनकर, शरद जाधव, संदीप गायकवाड, भूवन बेल्हेकर हेही उपस्थित होते.
समतेचा विचार पुढे नेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला. संत महात्म्यांचे समानतेचे विचार, तत्त्वज्ञान त्यांनी राज्यघटनेत एकत्र करून देशाला संविधान दिले. ते मानवतेचे मानबिंदू आहेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब गायकवाड केले.